26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Home‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ, ४ वेळा ‘युपीएससी’ क्लियर, तरी नोकरीचा पत्ता नाही!

‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ, ४ वेळा ‘युपीएससी’ क्लियर, तरी नोकरीचा पत्ता नाही!

 

रूरकी : वृत्तसंस्था
महाराष्ट्र केडरच्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या कारनाम्यामुळे जबरदस्त चर्चेत आहेत. मात्र या सर्व घटना घडामोडीत यूपीएससीच्या आणखी एका उमेदवाराचे नाव चर्चेत आले आहे. त्याचे नाव आहे कार्तिक कंसल, ते इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. कार्तिक यांनी चार वेळा यूपीएससी परीक्षा क्लियर करूनही त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही सर्व्हिसमध्ये जागा मिळालेली नाही.

इस्रो सायंटिस्ट कार्तिक कंसल यांची स्टोरी अत्यंत प्रेरणादायक आहे. कार्तिक कंसल हे डिसॅबिलिटीच्या पीडब्ल्यूबीडी-१ श्रेणीत येतात. ते मुळचे उत्तराखंडमधील रुडकी येथील आहेत. कार्तिक यांना मस्कुलर डिस्ट्रॉफीचा त्रास आहे. या आजारात काळानुसार स्रायू कमकुवत होऊ लागतात. ते वयाच्या १४ व्या वर्षापासून व्हीलचेअरवर आहेत.

असे आहेत कार्तिक कंसल : कार्तिक कंसल यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. ते सध्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. ऑल इंडिया सेंट्रल रिक्रूटमेंटच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत त्यांची निवड झाली. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांना मस्क्यूलर डिस्ट्रोफीचे निदान झाले. यामुळे ते वयाच्या १४व्या वर्षापासूनच व्हीलचेअरचा वापर करत आहेत.

‘यूपीएससी’त ४ वेळा यशस्वी : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे, कार्तिक कंसल यांनी या परीक्षेत तब्बल चारवेळा यश संपादन केले. यावरूनच त्यांच्या बुद्धीमत्तेचा अंदाज येऊ शकतो. त्यांनी २०१९ (रँक ८१३), २०२१ (रँक २७१), २०२२ (रँक ७८४) आणि २०२३ ( रँक ८२९) मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत यश मिळवले आहे.

कुठल्याही सेवेसाठी नाही निवड : कार्तिक कंसल यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रात ते ६०% अपंग असल्याचे नमूद केले होते. मात्र, एम्स बोर्डाच्या तपासात ९०% अपंगत्व असल्याचे आढळून आले. संघ लोक सेवा आयोगाने मस्कुलर डिस्ट्रॉफी हा आजार भारतीय महसूल सेवा (आयकर) ग्रूप अ आणि भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क) साठी पात्र उमेदवारांच्या सेवा शर्तींत समाविष्ट केला होता. मात्र तरीही त्यांना नियुक्ती मिळाली नाही.

जागा असूनही निवड नाही : कार्तिक कंसल यांना २०१९ मध्ये ८१३ व्या रँकसह सेवा दिली जाऊ शकत होती. त्या वर्षी लोकोमोटर डिसॅबिलिटी अंतर्गत १५ जागा रिक्त होत्या, त्यांपैकी १४ पदे भरण्यात आली. यानंतर २०२१ मध्ये लोकोमोटर अपंगत्व श्रेणीतील ७ पैकी केवळ ४ पदे भरण्यात आली. या कॅटेगिरीमध्ये कार्तिक कंसल पहिल्या क्रमांकावर होते. मात्र तरीही त्यांची निवड झाली नाही.

कॅटमध्ये केस प्रलंबित : कार्तिक कंसल सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलमध्ये आपली केस लढत आहेत. २०२१ पासून त्यांच्या युपीएससी रिझल्टच्या आधारे हे प्रकरण कॅटमध्ये पेंडिंग आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR