19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रईडीचे २३ ठिकाणी छापे

ईडीचे २३ ठिकाणी छापे

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ईकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण २३ ठिकाणी छापे मारण्यात आले. ‘व्होट जिहाद’ प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असू शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राज्यात सर्वत्र महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरु आहेत. येत्या १८ तारखेला संध्याकाळी प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

नॅशनल मर्कंटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी आहे. १०० कोटीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाच हे प्रकरण आहे. नाशिकमधून अटक केलेल्या सिराज अहमदशी संबंधित ही छापेमारी आहे. व्होट जिहादसाठी १०० कोटीहून अधिक पैशांचा वापर झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR