बारामती : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे. सुप्रिया सुळेंना एक फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले, तर तो व्यक्ती ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचे सागंत आहे, याबाबतची माहिती आपण निवडणूक आयोगाला देणार असल्याचे सुळेंनी यावेळी सांगितले आहे.
माझ्याकडे एक फोन सातत्याने येतोय. तो माणूस मला काय काय सांगतोय. मी याची माहिती निवडणूक आयोगाकडे देणार आहे. कारण माझा या गोष्टीवर विश्वास नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होऊ नये एवढीच माझी मागणी. कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होऊ नये. त्यामुळे याची माहिती मी निवडणूक आयोगाला देणार आहे.
पवारांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया
अजित पवारांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी तयार होण्याआधी सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबरच्या चर्चेसाठी शरद पवारांसह उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी युटर्न घेतला, त्याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा प्रश्न तुम्ही अजित पवार यांना विचारा. मी आधीच म्हटले होते मला हे झालेला माहिती नाही.