25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeलातूरउजाड रानावर बहरली वनराई; दररोज २० टन ऑक्सिजनची निर्मिती

उजाड रानावर बहरली वनराई; दररोज २० टन ऑक्सिजनची निर्मिती

लातूर : प्रतिनिधी
शहराचा मध्यवर्ती भागात, समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्याचा उद्दात हेतूने स्व. शेठ पुरणमल लाहोटी यांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत चालणा-या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल व राजस्थान विद्यालयाचा पाठीमागे एकेकाळी उजाड असलेल्या परिसरात आता घनदाट वनराई बहरलेली दिसत आहे. हा परिसर हिरवाईने नटला असून परिसरात दाट हिरवळ पसरली असून दररोज २० टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे.

वाढत्या प्रदूषणाचे धोके आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन, श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थचे सचिव ऍड. आशिष बाजपाई यांच्या संकल्पनेतून शाळेच्या साडे सात एकर परिसरात विविध प्रकारच्या प्रजातींच्या सुमारे ५००० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात अर्जुन, शिरीष, आंबा, कडुलिंब, सिसम, बुच, साग आदींचा समावेश आहे. आज लागवड केलेल्या सर्व वृक्षांची वाढ झाली असून पूर्वीचा भयाण वाटणा-या जागेवर हिरवाईच्या लहरीमुळे परिसराचे सौंदर्य वाढले असून परिसर निसर्गरम्य बनला आहे. नागरिकांना व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्यात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला गेला आहे.

परिसरातील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा पाठीमागे ५६०० स्क्वेअर फुट जागेत पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी पद्धतीने २८०० वृक्षांची १९ जुलै २०२१ रोजी लागवड केली आहे तर बाजूचा परिसरात संस्थेद्वारा २ जुलै २०१८ रोजी राजस्थान विद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, ऍड. कमलाकर कुलकर्णी, अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते, संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, संस्थाध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी सहउपाध्यक्ष दिनेशकुमार इनानी, सहसचिव शरदकुमार नावंदर, उपसहसाचिव लक्ष्मीकांत कर्वा, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, विश्वास मंडळाचे सदस्य डॉ. अनिल राठी, हुकुमचंद कलंत्री, शांतीलाल कुचेरिया, सूर्यप्रकाश धूत आदींच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

या वृक्षांचे संगोपन करण्याची जबबदारी संस्थांतर्गत राजस्थान विद्यालय, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, श्री गोदावारीदेवी लाहोटी विद्यालय, पुरणमल लाहोटी पाठशाळा, केशरबाई भार्गव विद्यालय, सुरजकुंवरदेवी क्रियेटीव्ह किड्स या शाळांना दिली होती. संस्था पदाधिकारी, शिक्षक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. झाडांचे संगोपन करण्यासाठी सांडपाणी, नालीचे पाणी, पावसाचे पाणी, स्वतंत्र जलसाठा, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन उत्तम केले आहे म्हणून भर उन्हाळ्यात देखील परिसर नयनरम्य दिसतो. या वनराईमुळे परिसरातील वातावरणात सकारात्मक बदल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR