24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरउदगीरातील अनेक हॉटेलमध्ये अशुद्ध पाण्याचा वापर

उदगीरातील अनेक हॉटेलमध्ये अशुद्ध पाण्याचा वापर

उदगीर :   प्रतिनिधी
उदगीर शहरातील अनेक हॉटेलमध्ये अशुद्ध पाणी वापरले जात असून यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अन्न भेसळ कार्यालयाचे उदगीर शहराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून तहसील कार्यालयानेही शहरातील सर्व हॉटेलमधील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळा येथे तपासून भेसळयुक्त अशुद्ध पाणी वापरणा-या हॉटेल चालकावर कार्यवाई करण्याची मागणी होत आहे .
सद्या उदगीर शहरातील ८० टक्के लोक वॉटर फिल्टरचे पाणी पीत आहेत मात्र सर्वसामान्य माणूस घराच्या बाहेर पडला की त्यांना हॉटेलमधील दोन दोन दिवस साठवूनक केलेले असुद्ध पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. तहसीलदार यांनी शहरातील हॉटेल मधील पाणी तपासून तात्काळ कार्यवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच उदगीर शहरात घरगुती गॅस हॉटेलमध्ये वापरण्यास बंदी असताना छोटे मोठे व्यवसायिक आपल्या व्यवसायासाठी असलेले गॅस मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना  उदगीर शहरातील सर्वच हॉटेल मध्ये सर्रास गुटखा विकला जात आहे. अन्न भेसळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. उदगीरातील प्रशासनाने आणि संबंधित विभागाच्या अधिका-यांंनी लक्ष देणे गरजेचे आहे. उदगीर शहरातील हॉटेल मधील पाणी यांची तपासणी करून तात्काळ कार्यवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR