25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeलातूरउदगीर आगारामार्फत विद्यार्थिनींना एसटी पासचे वितरण

उदगीर आगारामार्फत विद्यार्थिनींना एसटी पासचे वितरण

लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत उदगीर बस आगारामार्फत आगार प्रमुख सतीश तिडके, गटशिक्षणाधिकारी शफिक शेख यांच्या उपस्थितीत उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी वर्गात शिकणा-या विद्यार्थिनींना मोफत एसटी पासेसचे वितरण करण्यात आले. यावेळी वाहतूक निरीक्षक सुरेश कजेवाड, मुख्याध्यापक व्ही. एम. बांगे, उपमुख्याध्यापक बी. बी. नागरवाड, पर्यवेक्षक राम ढगे, कला शिक्षक तथा पास विभाग प्रमुख एन. आर जवळे, बी. व्ही. बिरादार, डी. पी. बिरादार यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पासधारक विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उदगीर आगारामार्फत उदगीर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तास बुडवून पास घेण्याकरिता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR