24.1 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरउदगीर येथील तलाठी लाच घेताना रंगेहाथ

उदगीर येथील तलाठी लाच घेताना रंगेहाथ

उदगीर : प्रतिनिधी

उदगीर येथील तहसील कार्यालयातील तलाठ्यास दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांने रंगेहात पकडले आहे. उदगीर येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेला उमेश प्रकाश तोडकरी वय ४२ उदगीर, रा. गोल्डन वूड्स सोसायटी देगलूर रोड याने तक्रारदाराच्या काकंूच्या नावे हणमंतवाडी (देवर्जन) ता. उदगीर येथील गट न. १०२ मधील शेती पाझर तलावासाठी संपादित जमीनाचा मावेजाची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला व पुढील अपीलासाठी त्रुटी न काढण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

त्या प्रमाणे तलाठी कार्यालयात जाऊन तक्रारदाराने पंचासमक्ष २ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारली. याबाबत पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक पंडीत रेजितवाड यांच्यासह सापळा अधिकारी व पथक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक व पथकांनी ही कार्यवाही केली. तपास अधिकारी भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक, हे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR