सातारा : लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यामध्ये, उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीपासूनच आघाडी-पिछाडी दिसून येत होती.
मात्र, १४ व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकल्याचं दिसून आलं. उदयनराजे १४ व्या फेरीत ४००० मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकज जल्लोष केला. त्यावेळी, उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.