मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीत मंत्रिमंडळातील ३९ मंर्त्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंळातील काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुस-या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे.