21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरउद्यानाच्या माध्यमातून गांधी मार्केटमध्ये एक नवीन विरंगुळा केंद्र

उद्यानाच्या माध्यमातून गांधी मार्केटमध्ये एक नवीन विरंगुळा केंद्र

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरातील प्रभाग ८ मधील महात्मा गांधी मार्केट येथे सर्व सोयीसुवीधायुक्त उद्यान सेवेत सुरु झाले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लातूरकरांना नवीन विरंगुळा केंद्र मिळाल आहे. या उद्यानात लातूरकरांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तसेच, हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे झाले आहे.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २३ जानेवारी रोजी उद्यानाचे नुतनीकरण व दुरुस्ती कामाची पाहणी केली, उद्यानातील केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. लातूर शहरातील विशेषता महात्मा गांधी मार्केट येथील व्यापारी, विद्यार्थी आणि नागरीक यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन ही जागा दुर्लक्षित असून या जागेवर सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी केली होती. त्यांनी येथे उद्यानाची निर्मिती करण्यासाठी सुमारे ८० लाख २५ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्या करीता पुढाकार घेतला.
उद्यानात अद्ययावत सुवीधेसह सुशोभीकरण करण्यासाठी विविध प्रकारची फुल झाडे आणि वृक्ष लावण्यात आले आहेत. यामध्ये गुलाब, चाफा, मोगरा, रातराणी फुलझाडे आहेत तर कडेनी बांबू लावण्यात आले आहेत. उद्यानातील सुशोभीकरणामुळे परिसराची देखील शोभा वाढली आहे. उद्यानाची देखभाल करण्यासाठी आवश्यक पाण्यासाठी विंधन विहीर (बोअर) घेवून पाण्याची व्यवस्था केली आहे. उद्यानातील फुलझाडांची मोहिनी, गुलाबाचा मोहक सुगंध, चाफ्याची शांत सुगंध, मोग-याचा आणि रातराणीची सुगंध या उद्यानाला एक वेगळीच ओळख निर्माण करुन देत आहे. येथे येणा-यांसाठी स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था आहे. उद्यानाचा वापर करता यावा यासाठी हेरीटेज लाईटचा वापर करुन आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सुरक्षा रक्षकासाठी केबीन सुवीधा असून सर्व मुलभूत सुविधा दर्जेदार उभारण्यात आल्या आहेत. यामुळे उद्यान पाहता क्षणी मनमोहक स्थळ म्हणून पसंतीस पडेल असे ठिकाण झाले आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचेमाजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात अभिनव प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे वास्तु विशारद पुणे येथील नामांकित महेश नामपुरकर आहेत तर या प्रकल्पाचे बांधकाम काम अभिजीत इगे यांनी पूर्ण केले आहे. या अभिनव उपक्रमाचे लातूर शहरातील व्यापारी, परिसरातील नागरिक यांच्याकडून कौतूक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR