मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयांवर बोलेन,’ असे यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यातील मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात बुधवारी विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडले. नाशिक वगळता अन्य मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे.
उद्यापासून होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने विरोधकांने चहापानाचे निमंत्रण देण्यात आले आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे.
मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंनीही महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.