22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरउमेदवारांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करावे

उमेदवारांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करावे

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश हे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. या निवडणुकीत आलेले अनुभव लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय व्हावेत या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन, माजी मंत्री, आमदार  अमित विलासराव देशमुख यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभुमीवर लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार दि. २३ जुलै रोजी सकाळी व्यापक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील एकूण कामकाजाचा आढावा घेण्यात येऊन प्रातिनिधिक स्वरुपात काही जणांचे अभिनंदन करुन सत्कारही करण्यात आला. यावेळी आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजन व चर्चा करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार रामहरी रुपनवर हे होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख,  लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सरचिटणीस मोइज शेख, सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंके, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन तथा काँग्रेसचे औसा विधानसभा निरीक्षक समद पटेल, लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरविंद भातांबे्र, महेश देशमुख आदीसह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष सर्व काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील अनुभवाचा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी उपयोग व्हावा या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना  माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी बोलतांना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय सर्व बुथवरीलवरील, कामाचा अभ्यास करावा, जिथे आपण कमी पडलो तेथील कारणांचा शोध घेऊन तेथे ताबडतोब दुरुस्त्या कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले, लातूर जिल्ह्यातील ऊदगीर, अहमदपूर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडून घ्यावेत, असे तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे या संदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील या दृष्टीने सर्वांनी आजपासूनच तयारीला लागावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.
या बैठकीचे प्रास्ताविक डॉ. जितेंद्र देहाडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लातूर लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले.  प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यांनतर बैठकीच्या सुरुवातीला लातूर लोकसभा मतदारसंघासघतील काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत करून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काँग्रेसच्या सर्व विधानसभा निरीक्षकांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे निलंगा विधानसभेचे निरीक्षक संतोष देशमुख, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन तथा लोहा कंधार विधानसभेचे निरीक्षक विजय देशमुख, लातूर ग्रामीण विधानसभेचे काँग्रेसचे निरीक्षक अनुप शेळके, काँग्रेसचे उदगीर विधानसभेचे निरीक्षक रवींद्र काळे,  लातूर शहर विधानसभेचे काँग्रेसचे निरीक्षक अ‍ॅड. दीपक सूळ, महाविकास आघाडी लातूरचे समन्वयक सचिन बंडापले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, लातूर जिल्हा  महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.
डॉ. स्मिता खानापुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR