23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपरभणीएकास फायटरने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एकास फायटरने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : बघण्याच्या कारणावरून एकास लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक रोडवर घडली.

याबाबत जखमी सुनील अशोक पंगुडवाले (वय ४०, रा. मंगळवेढेकर चाळ, मुरारजी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हर्षल जाधव, विक्रांत जाधव (रा. धरमसीलाईन, एस.टी. स्टैंडसमोर) आणि एक अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुनील पंगुडवाले हे त्याचा मामा ससाणे यांना भेटून घरी जात होते.

त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर हर्षल जाधव हा उभा होता. जाधव याने पंगुडवाले यास माझ्याकडे का बघतो, असे विचारले. त्यावेळी पंगुडवाले याने मी तुझ्याकडे बघत नाही असे सांगितल्यानंतर जाधव याने त्यास शिवीगाळ करत थांबविले व त्याच्या मोबाईलवरुन फोन करुन कोणासतरी बोलावले. त्यानंतर त्याठिकाणी बुलेट गाडीवर विक्रांत जाधव व एक अनोळखी व्यक्ती तिथे आले.

त्यांनी पंगुडवाले यास शिवीगाळ करीत, विक्रांत जाधव याने त्याच्या खिशातून एक लोखंडी फायटर काढून तुला खल्लास करतो, असे म्हणून पंगुडवाले याच्या डोळ्याजवळ मारहाण केली. त्यामुळे पंगुडवाले हे चक्कर येऊन खाली पडले. तरीही आरोपींनी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन मेला का बघ रे असे म्हणून तिथून पळ काढला, अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR