22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयएनटीआर कन्या लोकसभाध्यक्षाच्या स्पर्धेत!

एनटीआर कन्या लोकसभाध्यक्षाच्या स्पर्धेत!

राजमुंद्री : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेश भाजपाध्यक्ष तथा राजमुंद्रीच्या खासदार दग्गुबाती पुरंदेश्वरी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याच्या विचारात भाजप असल्याचे दिसून येत आहे. पुरंदेश्वरी यांना १८ व्या लोकसभेचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. लोकसभा अध्यक्षपदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव सर्वात पुढे आहे.

पुरंदेश्वरी यांना लोकसभाध्यक्षपद मिळाले, तर त्या या पदावर विराजमान होणा-या आंध्रच्या दुस-या खासदार असतील. यापूर्वी, अमलापुरमचे माजी खासदार गंती मोहन चंद्र बालयोगी हे १२ व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. २००२ मध्ये लोकसभा अध्यक्ष असतानाच बालयोगी यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.

कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी : दग्गुबाती पुरंदेश्वरी या २०२३ पासून आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत. तेलगू देसम पार्टीचे संस्थापक एनटीआरच्या कन्या आहेत. पुरंदेश्वरी या तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. लोकसभा निवडणूक २०२४ साठी आंध्र प्रदेशात भाजप, टीडीपी आणि जनसेना यांना एकत्र आणण्यात पुरंदेश्वरी यांची महत्वाची भूमिका होती. या लोकसभा निवडणुकीतीत येथून एनडीएचे २१ खासदार निवडून आले आहेत. यात १६ टीडीपी, तीन भाजप तर दोन जनसेनेचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही एनडीएने १७५ पैकी १६४ जागा जिंकल्या आहेत.

राजमुंद्री येथून खासदार होण्यापूर्वी, पुरंदेश्वरी यांनी काँग्रेसकडून २००४ मध्ये बापटला आणि २००९ मध्ये विशाखापट्टनमचे प्रतिनिधित्व केले होते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला आपला पाय आंध्र प्रदेशात रोवण्यात समस्या येत असतानाच पुरंदेश्वरी यांना जबाबदारी देण्यात आली. पुरंदेश्वरी यांनी पक्षाला आठ विधानसभेच्या जागांवर (लढवलेल्या १० पैकी) आणि तीन लोकसभेच्या जागांवर (सहा पैकी) विजय मिळवून दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR