उदगीर : बबन कांबळे
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी एस.टी.महामंळाच्या अहमदपूर बसचा चालकाच्या बाजूकडील दरवाजा प्रवासात तुटून पडल्यामुळे चालक विचलीत झाला. यामुळे अनेक प्रवाशांच्या जिवीतास होणारा धोका टळला. दुपारी अहमदपूर आगाराची अहमदपूर- उदगीर जाणारी बस हाळीपास करुन उदगीर कडे जात असताना बालाजी लंच होम समोर धावत्या बसचा दरवाजा तुटून पडला. बाजूने जात असलेल्या दुचाकी चालक बालबाल बचावला. बस चालकांचे अचानक दरवाजा खाली पडल्याने घाबरून नियंत्रण सुटता सुटता सावरले .
एस.टी.प्रवास सुखाचा प्रवास असं संबोधलें जाते पण आज प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. ब-याच वेळी प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यामध्ये टायर फुटल्याने गाडीत स्टेपणी नसते इतर आवश्यक गोष्टी पण बसमध्ये उपलब्ध नसतात. त्यावेळी चालक व वाहकाना वाट बघत बसायची वेळ येते. अशा अनेक बसेस जुन्या आहेत त्यांना रोडवर चालवण्यासाठी परवानगी ही नसेल असा अंदाज आहे मग बस प्रवास सुरक्षीत कसा असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.