17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeए-१, ए-२ दूध विक्रीला मनाई; प्रोटीनचे स्ट्रक्चर पचन व्यवस्थेस घातक

ए-१, ए-२ दूध विक्रीला मनाई; प्रोटीनचे स्ट्रक्चर पचन व्यवस्थेस घातक

मुंबई : वृत्तसंस्था
अन्न सुरक्षा नियामक ‘फसई’ने ई-कॉमर्ससह इतर खाद्य कंपन्यांनाही पॅकेटने ‘ए-वन’ आणि ‘ए-टू’ प्रकारचे दूध आणि डेअरी प्रोडक्­टचे दावे हटविण्याचे आदेश दिले आहेत.

‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे की, हे दावे फूड सेफ्टी अँड स्­टँडर्ड अ‍ॅक्­ट, २००६ नुसार नाहीत. आता एफएसएसएआयने नुकत्याच काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. ए-वन आणि ए-टू मधील अंतर दुधातील बीटा-केसीन प्रोटीनच्या स्­ट्रक्­चरशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.

सध्याचे ‘एफएसएसएआय’ नियम या फरकाला मान्यता देत नाहीत. फूड बि­झिनेस ऑपरेटर्सचा उल्लेख करत ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे की, ‘एफबीओ’ला आपल्या प्रोडक्­टवरून अशा प्रकारचे दावे हटविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, ई-कॉमर्स प्­लॅटफॉर्मवरूनही अशा प्रकारचे दावे तत्काळ हटविण्यास सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कंपन्यांना आधीपासूनच प्रिंट लेबल संपविण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. यानंतर कसल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही.

ए-१ आणि ए-२ दुधात बीटा-केसिन प्रोटीनचे स्ट्रक्चर वेगवेगळे असते, जे गायीच्या जातीनुसार वेगवेगळे असते. या सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे नियामकाने म्हटले आहे.

काय आहे ए-१ आणि ए-२ प्रोटीन…?
ए-१ हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. हे गायीच्या दुधात आढळते. ते जेव्हा पचवले जाते तेव्हा एक अशा प्रकारचे पेप्टाइड तयार होते ज्याला बीटा-केसिन ए १-कॅसोमॉर्फिन-७ (बीसीएम-7) म्हटले जाते. काही लोकांच्या मते हे पेप्टाइड पाचन तंत्राशी संबंधित समस्यांचे कारण बनू शकते. याशिवाय ए-२ देखील एक प्रकारचे प्रोटीन आहे. हेही गायीच्या दुधातच आढळते. ए-१ आणि ए-२ या दोन्ही प्रकारच्या दुधात बीटा-केसीन प्रोटीनचे स्­ट्रक्­चर मात्र वेगवेगळे असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR