मुंबई : राज्यात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. गणेशोत्सव राज्यासह देशभरात आणि विदेशातही थाटामाटात साजरा केला जातो. अशातच सिनेअभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने आपल्या आई आणि मुलीसह बाप्पाचे दर्शन घेतले. ऐश्वर्या बप्पाचे दर्शन घेतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सेलेब्रिटीही आवर्जून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लालबागमध्ये पोहोचतात.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनी यावर अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर बच्चन कुटुंबातील कोणीही या अफवांवर काहीही बोललेले नाही. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक प्रसंगी वेगळे येताना पाहिल्यानंतर त्यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.
यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे बोलले जात आहे.
अभिषेकसोबत सर्व काही ठीक नसल्याच्या वृत्तादरम्यान, ऐश्वर्या राय आराध्या आणि आई वृंदा राय यांच्यासह बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील जेएसबी सेवा मंडळाच्या गणपती पंडालमध्ये पोहोचली. तिचे बाप्पाच्या दर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.