22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयऑलिम्पिकचे उद्घाटन थाटात

ऑलिम्पिकचे उद्घाटन थाटात

बोटींमधून संचलन, ओपनिंग सेरेमनी उत्साहात

पॅरिस : वृत्तसंस्था
क्रीडा विश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पर्वाला शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ पासून सुरुवात झाली असून, मध्यरात्रीनंतर सीन नदीच्या काठावर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. परंपरेला फाटा देत २०६ देशांच्या क्रीडापटूंनी सीन नदीतील बोटींमधून परेडमध्ये सहभाग नोंदविला आणि त्याचवेळी पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी सुरू झाली.

प्रत्येक देशांच्या खेळाडूंच्या संचलनासाठी १०० बोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. सीन नदीवर ८ कि.मी. अंतरावर बोटींमधून संचलन करण्यात आले. प्रत्येक राष्ट्राचे खेळाडू त्यांच्या ध्वजवाहकासह बोटीने आयफेल टॉवरवर पोहोचले. त्यामुळे सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लक्षवेधी ठरला.

फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्यूअल मॅकरोन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांच्यासोबत फ्रान्सचे महान फुटलाबॉलपटू जिनेदीन जिदानला अगोदरच रेकॉर्ड केलेल्या व्हीडीओत ऑलिम्पिक मशालसोबत पॅरिसच्या रस्त्यावर धावताना दाखविले. त्यानंतर ६ कि. मी. परेड आस्टरलिज ब्रिजपासून सुरू झाला. यामध्ये ८५ नावांमधून २०६ देशांचे ६८०० पेक्षा अधिक क्रीडापटू सहभागी झाले. ब-याच क्रीडापटूंनी उद्या स्पर्धा असल्याने सहभाग नोंदविला नाही. मात्र, उद्घाटन सोहळा अतिशय थाटात पार पडला.

आयोजकांनी सुरक्षा आणि तार्किक आव्हानांपलिकडे जाऊन संपूर्ण शहराला उद्घाटनाचा एक भाग बनवून एक अभूतपूर्व नजारा पेश केला. हे दृश्य विलोभनीय ठरले. सर्व देशांतील टीमच्या परेडनंतर आयफेल टॉवरवर लेडी गागाचा शो पार पडला. लेडी गागाने आपल्या गायन कौशल्याने आणि सुंदर देखाव्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी क्रीडापटूंमध्ये सळसळणारे चैतन्य आणि उत्साह ओसंडून वाहात होता.

ही ऑलिम्पिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत पार पडणार आहे. २६ जुलै रोजी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऑलिम्पिकमध्ये २०६ देशांतील १० हजारांच्या आसपास खेळाडू सहभागी झाले आहेत. ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीन नदीवर उद्घाटन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले.

भारतीयांचा पेहराव ठरला लक्षवेधी
भारतीय क्रीडापटूंचे प्रतिनिधित्व दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांनी केले. या दोघांची ध्वजवाहक म्हणून निवड केली होती. पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ््यात ११७ भारतीय खेळाडूंची झलक पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंनी पांढ-या रंगाचे कपडे परिधान केले होते. खेळाडूंसाठी उद्घाटन समारंभाचे किट डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाईन केले होते. भारत संचलनात ८४ क्रमांकावर सहभागी झाला. टोकियो ऑलिम्पिकमधील ७ पदकांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता पॅरिस येथे होत असलेल्या स्पर्धांत दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट भारतीय पथकाने डोळ््यासमोर ठेवले आहे. ३८३ खेळाडूंसह सर्वांत मोठा संघ स्पेनचा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR