35.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeराष्ट्रीयओडिशात रेल्वे अपघात; ११ डबे रुळावरून घसरले

ओडिशात रेल्वे अपघात; ११ डबे रुळावरून घसरले

ओडिशा : ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणा-या कामाख्या एक्सप्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चौधर परिसरातील मंगुली पॅसेंजर हॉल्टजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेस (१५५५१) चे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत आम्हाला ११ एसी कोच रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. कोणीही जखमी झालेले नाही.

सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अपघात मदत ट्रेन, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR