26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘ओपन एआय’ची पोलखोल; सुचिरचा संशयास्पद मृत्यू

‘ओपन एआय’ची पोलखोल; सुचिरचा संशयास्पद मृत्यू

 

सॅन फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
सुचिर बालाजी या ‘ओपन ए-आय’च्या माजी संशोधकाचा संशयास्पद मृत्यू झाला. सॅन फ्रान्सिस्को येथे सुचिर बालाजीचा मृतदेह आढळला. पोलिसांचा अंदाज आहे की, त्यांनी आत्महत्या केली असावी. त्याने ‘चॅट-जीपीटी’ वर गंभीर आरोप केले होते. सुचिरने आपल्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जनरेटिव्ह एआय आणि कॉपीराईटबाबत आपले विचार मांडले होते. दरम्यान, सुचिर बालाजीचा मृत्यू २६ नोव्हेंबरला झाला. पण १४ डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.

सुचिर अवघ्या २६ वर्षाचा होता. त्याने ‘चॅट-जीपीटी’ मेकर ‘ओपन ए-आय’च्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. अचानक त्याचा मृत्यू झाल्याने संशय वाढला आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलीस त्याच्या मृत्यूचा छडा लावत आहेत. मात्र, प्राथमिक तपासणीत त्यांना संशयास्पद असं काही आढळलेलं नाही. सुचिरने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

सुचिर ‘ओपन ए-आय’मध्ये रिसर्चर म्हणून काम करत होता. त्याने याच वर्षी ही कंपनी सोडली होती. कंपनी सोडल्यानंतर त्याने ‘चॅट जीपीटी’ मेकरवर आरोप केले होते. ‘चॅट जीपीटी’ मेकरने कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचे त्याने म्हटले होते. जवळपास चार वर्ष ओपन एआयमध्ये काम केल्यानंतर त्याने कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. न्यूयॉर्क टाइम्सला त्याने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने काही गोष्टी सांगितल्या होत्या. या तंत्रज्ञानाने समाजात चांगला प्रभाव पडणार नाही, वाईटच प्रभाव पडणार आहे, असे त्याने म्हटले होते. पण ओपन एआय कथितरित्या कॉपीराईट डेटाचा वापर करत असल्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR