22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Home‘ओबीयू’ द्वारे होणार सॅटेलाईट टोल संकलन!

‘ओबीयू’ द्वारे होणार सॅटेलाईट टोल संकलन!

सॅटेलाईट टोल । ना टोलनाक्यावर वेटिंग, ना हायवेवर जाम, ना लोकांच्या वेळेचा अपव्यय; प्रवास होणार सोपा आणि सुखकर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या वाहनांना टोल देण्यासाठी टोल नाक्यावर थांबावे लागते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर लागत होते. तसेच, अनेकदा तगडा जामही लागतो. फास्टॅग आल्यानंतर मनुष्यबळ कमी झाले. पण सर्व्हरमध्ये समस्या आल्यास जामची समस्या कायम होती. आता सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीममध्ये टोल कारमध्ये लावलेल्या ट्रॅकिंग सिस्टीमद्वारेच वसूल केला जाईल. यासाठी सॅटेलाइट स्वत:च कारच्या निश्चित केलेल्या अंतराची गणना करेल आणि त्यानुसार टोल वसूल केला जाईल. या सिस्टीमला सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम किंवा जीपीएस बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम म्हणतात.

सॅटेलाईट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम कारमध्ये लावलेल्या ओबीयू (ऑन-बोर्ड युनिट) च्या मदतीने काम करेल. या ओबीयूच्या मदतीने सॅटेलाईट कारच्या निश्चित केलेल्या अंतराचा मागोवा घेईल. या नवीन सिस्टीमसाठी कारमध्ये ओबीयू बसवावा लागेल. हे ओबीयू कारची प्रत्येक माहिती गोळा करेल, ज्याला हायवेवर लावलेल्या कॅमे-यांनी सॅटेलाइटसोबत शेअर केले जाईल, ज्यामुळे सॅटेलाइटद्वारेच टोल वसूल केला जाईल. या सिस्टीममध्ये तुम्हाला ओबीयूसोबत जोडलेल्या वॉलेटमध्ये पैसे ठेवावे लागतील. सध्या कारमध्ये ओबीयू उपलब्ध नाही, त्याला बाजारातून बसवावे लागेल. असे मानले जात आहे की, ही सिस्टीम लागू झाल्यानंतर कारमध्ये ओबीयू आधीपासून लावलेले असतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा आहे की, संपूर्ण जगात हा पहिलाच टोल कलेक्शन सिस्टीम आहे, ज्यामध्ये जीपीएस बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नवीन टोल कलेक्शन सिस्टीम लागू झाल्याने वाहनचालकांना टोलवर थांबावे लागणार नाही. यामुळे हायवेवर ना तर जाम लागेल आणि ना लोकांचा वेळ वाया जाईल. असे मानले जात आहे की, या सिस्टीममुळे प्रवास आणखी सोपा होईल.

डिसेंबर २०२३ मध्ये, नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे लक्ष्य मार्च २०२४ पर्यंत या नव्या प्रणालीला लागू करण्याचे आहे, असे सांगितले होते. टोल नाक्यावरीला प्रक्रियांना सुव्यवस्थित करणे आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल वर्ल्ड बँकेला सूचित करण्यात आले आहे. सॅटेलाईट टोल नाक्यावरील सरासरी प्रतीक्षा वेळ लक्षणीय कमी झाला आहे. कर्नाटकातील बंगळुरू-मैसूर विभागात आणि हरियाणातील पाणिपत-हिसार विभागात या प्रणालीचा यशस्वी वापर झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR