22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत

ओबीसींचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत

सांगली : प्रतिनिधी
‘ओबीसींच्या डोक्यात खूळ बसले आहे की, हिंदू खतरे में हैं. पण हे खूळ बाजूला करावे लागेल. हे खूळ भाजपने उभे केले आहे. भाजप ओबीसींच्या बाजूने का नाही? त्यामुळे हे धर्माचे भूत उभे केले आहे. या निवडणुकीत आरक्षण वाचायचे की जाऊ द्यायचे, तर स्वत:ला मतदान करायचे आहे. एक छगन भुजबळ निर्माण करून चालणार नाही, अनेक भुजबळ उभे करावे लागणार आहेत. ओबीसींचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा आज सांगलीत पोहोचली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी महत्त्वाचे आवाहन केले.

ओबीसीच्या ५७ जागा राखीव आहेत. तर याच्यावर नजर असणार आहे. या निवडणुकीत आरक्षण बचाव हा मुद्दा असणार आहे. पण कुठलीही पार्टी आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही हे पाहणार आहे. ओबीसींचे किमान १०० उमेदवार निवडून आणणार का? हे पाहावे लागेल. सगेसोयरे कायदा आणायचा यांनी ठरवले तर छगन भुजबळ थांबवू शकत नाहीत. कारण आपले संख्याबळ नाही. त्यामुळे हे सर्व पक्ष ओबीसींच्या विरोधात आहेत. आणि येणा-या निवडणुकीत पक्ष बघू नका, स्वत:कडे बघा, आरक्षण वाचवणा-याकडे बघा’, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आरक्षण भिजत ठेवण्याचे काम
आरक्षण भिजत ठेवण्याचे काम हे करत आहेत. आता जी विधानं होत आहेत ते चिंताजनक आहे. एक तर आम्हाला द्या, नाहीतर सगळ्यांचे काढून घ्या. तर शरद पवार यांची मुलाखत होती की, येणा-या निवडणुकीमध्ये समाजाचे २२५ आमदार असतील. जरांगे पाटील खरा आहे, खोटा आहे? हे कुणीच सांगायला तयार नाही. आणि सगळ्यांनीच ठरवले आहे की, आपण मराठा समाजाची बाजू घ्यायची, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR