कंधार : प्रतिनिधी
लोहा व कंधार तालुक्यातील तीन ते चार दिवसात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका लक्षात घेता, शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कंधार लोहा युवक काँग्रेस तर्फे करण्यात आले.
कंधार लोहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे व काही गावातील खरीप पिके खरडून गेली आहेत. काही पिके वाहून गेली आहेत तर काही पिके पाण्याखाली गेली आहेत. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी लोहा व कंधार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन लोहा व कंधार तालुक्यातील तहसीलदारांना देताना लोहा कंधार विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश भोसीकर, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष रमेश सिंग ठाकूर, युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष मोहम्मद फाद्दू, युवा नेते महंमद नय्यर, मोहम्मद शोएब, अन्वर पठाण, माझी सैनिक नवघरे आनंद, शिवाजी बोरगावे, विजय सोळुंके, व मारोती पांचाळ हे मान्यवर उपस्थित होते.