25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरओळख स्व सामर्थ्याची हिरकणी महिला संमेलनास प्रतिसाद

ओळख स्व सामर्थ्याची हिरकणी महिला संमेलनास प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी

लोकसेवा मंडळाच्या वतीने लातुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ओळख स्व सामर्थ्याची हिरकणी महिला संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाचे उद्घाटन लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्ष घुगे-ठाकूर, सेवाभारतीच्या पद्माताई कुबेर यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनास लातूर, धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २३०० हुन अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला. या संमेलनाच्या माध्यमातून भारतीय स्त्री शक्तीचे आगळे वेगळे रुप पाहायला मिळाले

. जिल्हाधिकारी सौ. वर्ष घुगे-ठाकूर यांसह संमेलन प्रमुख विजया हुरदळे, सहप्रमुख उज्वला मसलेकर, जयश्री सुगरे, विद्या नाथबुवा, स्वाती अनारगट्टे, डॉ. सुनिता कामदार, सीमा अयाचित, रजनी महाजन, अनघा अंधोरीकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या दुस-या सत्रात पोलीस निरीक्षक वर्षा चंद्रपाल दंडीमे यांनी महिला सुरक्षा, डॉ. अमृता पाटील यांनी महिला आरोग्य, अ‍ॅड. स्मिता परचुरे यांनी निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, वैद्य आरती श्रीनिवास संदीकर यांनी अध्यात्मातील विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष जगदेवी लातूरे होत्या. सुत्रसंचलन शैलजा हासबे, अंजली आपशेटे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री सुगरे यांनी केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR