सोलापूर -शहरातील विजापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये होत असलेल्या गैरकारभारा संदर्भात आम आदमी पार्टीने आक्रमक भूमि का घेत संस्थेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
सरळ सेवा मार्फत रुजू असलेले अनेक शिल्पनिदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही. विध्यार्थ्यांना शिकवता देखील येत नाही. कित्येक वर्षांपासून मेकॅनिकल ट्रेडचे मशीन बंद अवस्थेत आहेत. निवड समितीने अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले आहेत ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही. विध्यार्थांना प्रात्यक्षिक करण्याकरिता लागणारे साहित्य साधने तसेच कच्चा माल उपलब्ध नाहीत.
विध्यार्थ्यांना प्रवेश देताना वाचनालयाकरिता शैक्षणिक फी मधून १००/- रुपये आकारले जातात मात्र अनेक वर्षांपासून वाचनालय बंद अवस्थेत आहे. अनेक वर्षांपासून शिल्पनिदेशकांचे पद रिक्त आहेत.
कौशल्य विकास सहसंचालक यांचे आदेश असताना देखील तेथे जुने तासिका तत्वावरील निदेशकांची नेमणूक करण्यात आलेले नाहीत. अशा एक ना अनेक समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबीत असल्याने याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आप पार्टीने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, शहर महासचिव म ल्लिकार्जुन पिलगेरी, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, सहसचिव रहीम शेख, युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड, युवा आघाडी पदाधिकारी सागर उडानशिव, संघटन मंत्री अस्लम पठाण, अर्जुन कांबळे उपस्थित होते.आंदोलन मागे घ्यावे अशी विंनती प्रभारी प्राचार्य एस. एम. धुमाळ यांनी आंदोलकांना केली.
मात्र आपचे पदाधिकारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. जोपर्यंत परिस्थितीला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. विध्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदवत राहू. आणि हे बेमुदत आंदोलन आणखीन तीव्र करू.अस आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी सांगीतले.