22.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeलातूरऔसा येथे धनगर समाजाचा मोर्चा

औसा येथे धनगर समाजाचा मोर्चा

औसा : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ नुसार समावेश असतानाही राजकीय पक्षाच्या नाकर्तेपणा व दुर्लक्षामुळे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. या मागणीसाठी शुक्रवारी दि २९ डिसेंबर २०२३ रोजी औसा येथील किल्ला मैदानावरून हजारो धनगर बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला.

मोर्चात हजारो समाज बांधव महिला युवक विद्यार्थी विद्यार्थिनीसह पारंपारिक धनगरी ढोल आणि हलगीच्या निनादामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत धनगर समाजाला आरक्षण त्वरित लागू करावे अशी मागणी करण्यात आली. औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून हजारो महिला व युवकांनी हातात पिवळे झेंडे गळ्यात गमजा व डोक्यावर पिवळ्या टोप्या घालून प्रशासनाचे लक्ष वेधले. सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे यासह अन्य विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांच्याकडे शालेय विद्यार्र्थीनींच्या वतीने देण्यात आले.

या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालय औसा येथे करण्यात आला. या मोर्चास वीरशैव ंिलगायत समाज आणि सकल मराठा समाजाने धनगर आरक्षणास पांिठबा असल्याचे पत्र धनगर समाजाच्या शिष्टमंडळास दिले. धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू नाही केल्यास आगामी काळात धनगर समाज शेळ्या-मेंढ्याांचे कळप व कुटुंबासह रस्त्यावर उतरणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तहसील कार्यालय औसा येथे सर्वश्री गणेश हाके, डॉ स्रेहा सोनकाटे, घनश्याम हाके, देविदास काळे,सौ ज्योती भोकरे,हनुमंत कांबळे, राजेश सलगर ,राम कांबळे, नितीन बंडगर, सुधाकर लोकरे, उद्धव काळे,आकाश कांबळे, मोहन चौरे ,तानाजी होळकर , सौ प्रमिला कांबळे, सुमन कांबळे, शशिकला दुधभाते, ज्ञानेश्वरी कांबळे, गोदावरी कांबळे, सविता गाडेकर, छाया कांबळे यांच्यासह हजारो महिला युवक व कार्यकर्ते, विद्यार्थी सहभागी झाले होते. धनगर आरक्षणासाठी आयोजित मोर्चामध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यातील धनगर
समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR