नाशिक : प्रतिनिधी
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका कंटेनरला भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ कंटेनरला अपघात झाला. मृतांमधील पाचपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये दोन तरुणांसह एका चिमुकल्याचा समावेश आहे. उतारावर कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटून कंटेनर खोल दरीत कोसळला. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
कसारा घाटात अपघात झाल्याचे वृत्त समजताच पोलिस तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. यावेळी ९ वर्षांच्या चिमुकल्यासह २१ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा दोन तरुणांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला.
नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत पाच जणांपैकी दोन जण मुंबईतील असल्याची माहिती आहे.