22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या

कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात संघटनेचा खळबळजनक आरोप!

मुंबई : राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक राजकीय वादांमुळे कंत्राटदारांना विकासकामे करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार राज्यभरातील कंत्राटदारांच्या दोन संघटनांकडून करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांच्या संघटनांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कंत्राटदारांना स्थानिक राजकारण्यांकडून कामात अडथळा, धमक्या व खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करतानाच यावर कारवाई न झाल्यास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कामं बंद करणार असल्याचा इशाराच या संघटनांनी दिला आहे.

महाराष्ट्र स्टेट कॉनट्रेक्टर्स असोशिअन अर्थात एमसीए आणि स्टेट इंजिनिअरिंग असोशिअन या दोन संघटनांकडून राज्याच्या प्रमुखांना पत्राद्वारे कंत्राटदारांच्या व्यथा कळवण्यात आल्या आहेत. ‘‘महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसत आहे. सत्ताधा-यांचे विरोधी पक्ष व स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी, राजकीय नेते विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणतात. यासाठी शारिरीक हिंसाही केली जाते. कंत्राटदारांकडून खंडणी उकळली जाते , असा गंभीर दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

स्थानिक पातळीवरच्या या गुंडांना केवळ प्रशासकीय अधिकारी आवर घालू शकत नाहीत. कंत्राटदारांना मारहाण करून त्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. कंत्राटदारांनी विरोध केल्यास त्यांना धमकावल्याचे प्रकार राज्यभर घडत आहेत. आधी ते कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करतात आणि नंतर त्याच्याकडून खंडणीची मागणी करतात असा आरोपही पत्रात केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR