लातूर : प्रतिनिधी
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर सुर्य देव आग वोखत आहे. यातच किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात काहि प्रमाणावर वाढ झाली असली तरी, बाजारपेठेत लिंबू सध्या चागलाच भाव खात आहे. उन्हाळयात घशाला कोरड पडली की आठवते थंड पेय किंवा लिंबू सरबत. केवळ याचसाठी नाही तर चक्कर येणे, गरगरणे, उन्हाचा त्रास होणे यासाठी होणारा लिंबाचा वापर पाहता उन्हाळ्यात लिंबाला बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने आता लिंबाचे वाढता भाव पाहता सर्वसामान्य ग्राहकाला लिंबू महाग झाले आहे. गेल्या काहि दिवसापासून उन्हाच्या चागल्याच झळा जानवत असल्याने शहरात ठिकठिकानी लिंबू शरबताचे गाडे लावण्यात आले आहेत.
सरबतासाठी विशेषकरून लिंबाला जास्त मागणी असल्याने लिंबाचे वाढलेले दर पाहता बाजारात आता लिंबू चागलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाचा तडाका चागलाच जानवत असल्याने लिंबूचे भाव तेजीत आहे. सध्या बाजारात द्राक्ष ५० ते ६० रुपये किलो, तर कलिंगड १० ते २० रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे. मात्र, एरव्ही अगदी किरकोळ भावात मिळणारे लिंबू मात्र आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक भावाने मिळत असल्याने लिंबू सरबताला घेतानाही ग्राहकाला दहावेळा विचार करावा लागत आहे.
एरव्ही अगदी दहा, वीसला पाच, आठ मिळणा-या लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढती दिसून येत आहे. अगदी बाजारपेठांमधून स्वस्तात मिळणारे लिंबू उन्हाळ्यात जरा जास्तच भावाने मिळत आहेत. सध्या लिंबू तेजीत असून सध्या खरेदीमध्ये १० रुपयांना एक किवा लहान असेल तर दोनच ल्ािंबू मिळत आहेत. विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत बाजारात ल्ंिबू कमी येत असल्याने आणखी भाव वाढेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदाच्या उन्हात शीतलता देणारे सरबताचे लिंबू जास्त भावात आलेले दिसून येत आहेत.