22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकमला हॅरिस यांना ओबामांचा पाठिंबा

कमला हॅरिस यांना ओबामांचा पाठिंबा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे. बराक ओबामा यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस यांनी ओबामा दाम्पत्याचा पाठिंबा मिळाल्यावर आनंद व्यक्त केला. बराक ओबामा यांनी आतापर्यंत अंतर राखले होते.

बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर लगेचच त्यांनी कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होण्यासाठी पाठिंबा दिला होता. तेव्हापासून अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र पाठिंबा दिला नव्हता. आता त्यांनीही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिकच्या उमेदवार होण्यासाठी आवश्यक प्रतिनिधींचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अधिवेशन बोलावत आहे. या बैठकीत हॅरिस यांना उमेदवार बनविण्यासाठी औपचारिक मतदान होईल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR