लातूर : प्रतिनिधी
शहरातील मालमत्ताधारकाकडे मालमत्ताकराची व पाणी पट्टी कराची थकबाकी मोठया प्रमाणात वसूल होणे बाकी असल्याने या वर्षातील शेवटची संधी म्हणून एक रक्कमी कराचा भरणा करणा-या मालमत्ताधारकांस लातूर शहर महानगरपालिकेमार्फत दि. २५ ते ३१ मार्चपर्यंत थकीत करावरील व्याज/शास्तीमध्ये ५० टक्के सूट देण्यात येत आहे.
जे मालमत्ताधारक कर भरणा करणार नाहीत अशा मालमत्ताधारकावर कार्यवाही करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमार्फत क्षेत्रीय कार्यालय ए, बी, सी, डी निहाय विशेष वसूली व जप्ती पथकाची नियुक्त करण्यात आली असून सदर पथकामार्फत जप्तीची कार्यवाही तिव्र करण्यात येणार असून सदर कार्यवाही अंतर्गत मालमत्ता सिल करणे,आटकाव करणे,नळ कनेक्शन बंद करणे,इत्यादी कार्यवाही करण्यात येणार असून मालमत्ता जप्त किंवा सिल करून मुदतीमध्ये मालमत्ताधारकांनी कर भरणा न केल्यास अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचा लिलाव, विक्री करून कर वसूल करण्यात येणार आहे. तरी व्याज, शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे देय असलेल्या कराचा भरणा करावा. व जप्तीसारखी कठू कार्यवाही टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.