18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकराची विमानतळाबाहेर मोठा स्फोट, ३ ठार, १७ जखमी

कराची विमानतळाबाहेर मोठा स्फोट, ३ ठार, १७ जखमी

कराची : पाकिस्तानातील कराची विमानतळाजवळ रविवारी रात्री उशिरा एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे तीन विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. या बॉम्बस्फोटात १७ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेल्या तीन परदेशी नागरिकांपैकी दोघे चीनचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कराची विमानतळाजवळ झालेल्या स्फोटाची संपूर्ण जबाबदारी या दहशतवादी गटाने घेतली आहे.

चिनी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री ११ वाजता हा स्फोट झाला, जिथे जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका टँकरमध्ये ही भीषण स्फोट झाला. सिंध प्रांतात वीज प्रकल्पावर काम करणा-या चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला, असा संक्षय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेची जबाबदारी बलुचिस्तान नॅशनल आर्मी या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

दरम्यान, सिंध प्रांताचे गृहमंत्री जिला उल हसन लांजर यांनी स्फोटात सुधारित स्फोटक यंत्र वापरल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज शहरातील अनेक भागात दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटात जखमी झालेल्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR