खेड : प्रतिनिधी
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी हे धरण १७ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते मात्र यंदा चार दिवस उशिरा म्हणजे २१ जुलै रोजी भरले आहे.
चास कमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागात वरदान ठरणारे हे धरण आज पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.
या धरणात २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते.