27.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरकाँग्रेस पक्षाचा हात, आम आदमी के साथ

काँग्रेस पक्षाचा हात, आम आदमी के साथ

लातूर : प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून देशाला महासत्ता बनविण्यापर्यंतचा सर्वांगिण विकास काँग्रेस पक्षानेच केलेला आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस पक्षाने धोरणं आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. तोच धागा पकडून विकासरत्न विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांच्या विचारावर पाऊल टाकत माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख काँग्रेस पक्षाचा हात आम आममी के साथ, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांच्या विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवित आहेत. त्यामुळे येत्या काळातही तमाम मतदारांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
रेणापूर तालूक्यातील इंदरठाणा, दर्जीबोरगाव, गव्हाण येथे दि. १९ सप्टेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धीरज देशमुख, डॉ. सारीका देशमुख, सुनिता अरळीकर, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेरमण सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हाईस अ‍ॅड. प्रमोद जाधव, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेरमण अनंतराव देशमुख, रेणापूर महिला कॉंग्रेस अध्यक्षा पुजाताई इगे, रेणापूर महिला कॉग्रेस शहर अध्यक्षा निर्मलाताई गायकवाड यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, येत्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या रणधुमाळीत भाजपाची मंडळी पुन्हा आपल्यासमोर येऊन दिशाभुल करणारी आश्वासने देतील, खोट्या जाहिरातींचे अमिष दाखवतील तेव्हा मतदारांनी त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता ते नेहमी आपल्या सुख-दु:खात सोबत असतात असे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा आशिर्वाद द्यावा. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार धिरज देशमुख व त्यांचे सर्व सहकारी लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या विकासासाठी कायम तत्पर आहेत.
आमदार धिरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा केलेला विकास आपल्या समोर आहे. दृश्यस्वरुपात विकासाची कामे आपल्याला पाहता येतील. शिवाय मांजरा परिवारातील साखर कारखाने आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये आर्थिक क्रांती घडविली आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणा-यांना अजिबात थारा न देता आमदार धिरज देशमुख यांना आशिर्वाद द्यावा.
याप्रसंगी महिला बचत गट मेळावा सभेसाठी उपस्थित असलेल्या महिला दैवशाला जोगदंड, फरजाना सय्यद, सरस्वती पवार, सरिता पवार, अनिता पवार, दिपाली माने, मंगलबाई घोडके, सारिकाबाई घोडके, मैणाबाई घोडके, शालूबाई क्षीसागर, मेराजबी सय्यद, कुशिर्वता रणदिवे, प्रतिक्षा माने, अश्वीनी पवार, किमाइण इंगोले, सावित्री पवार, रेखा पवार, प्रियंका पवार, चंद्रकला पवार यासह आदी महिलांची उपस्थित होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR