23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरकाँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. काळगे यांचा दणदणीत विजय 

काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. काळगे यांचा दणदणीत विजय 

लातूर : प्रतिनिधी 
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा ६१ हजार ८८१ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे ६१ हजार ८८१ मतांनी विजयी झाल्याचे घोषीत केले.  काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हाभरात जल्लोष केला.
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी येथील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतनमध्ये दि. ४ जुन रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली. एकुण २९ फे-यांमध्ये मतमोजणी पुर्ण झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मागे टाकत मताधिक्य घेतले. त्यानंतर मतमोजणीच्या एकाही फेरीत डॉ.  शृंगारे यांना मताधिक्य मिळवता आले नाही. डॉ. शिवाजी काळगे यांनी ६ लाख ९ हजार २१ मते घेतली तर सुधाकर शृंगारे यांना ५ लाख ४७ हजार १४० मते मिळाली. डॉ. काळगे यांनी ६१ हजार ८८१ एवढे मताधिक्य घेऊन शृंगारे यांचा पराभव केला.
या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढविलेले नरसिंगराव उदगीरकर यांना ४२ हजार २२५ मते मिळाली. विश्वनाथ आल्टे ५१२१, अतिथी सूर्यवंशी ५१७८, अ‍ॅड. श्रीधर कसबेकर ९९४, मच्छिंद्र कामत २२६९, प्रविण जोहारे १२७३, बालाजी गायकवाड ६८३, भरत ननवरे १४४९, भिकाजी जाधव ८६६, लखन कांबळे ७९५, विकास शिंदे ८०१, शंकर तडाखे ११२८, श्रीकांत होवाळ १३८२, अभंग सूर्यवंशी २१०२, अमोल हनमंते १०९९, उमेश कांबळे १६९१, दत्तू नरसिंगे २००२, दीपक केदार १७२६, पपिता रणदिवे ५८१, पंकज वाखरडकर ५१३, पंचशील कांबळे १२४१, अ‍ॅड. प्रदीप चिंचोलकर ५३३, रघूनाथ बनसोडे १६००, बालाजी बनसोडे ९५४, मुकेश घोडके ५२५, सुधाकर सूर्यवंशी यांना ६२० मते मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR