लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील कातपुर येथील दलित वस्तीतील नागरिकांसाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे या वस्तीतील रहिवाशांना स्वच्छ आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे कातपूर येथील पदाधिकारी आणि नागरीकांनी गावातील दलीतवस्तीमध्ये रस्तेविकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. आमदार देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावात दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून दलित वस्तीतीत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधा बाबत विकासनीधी मिळणेसाठी नेहमीच पाठपूरावा केला आहे. कातपुर येथील दलित वस्तीतील नागरिकांना आता सिमेंट रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होणार आहे. विशेषत: पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यामुळे होणारी अडचण दूर होईल. याशिवाय, या योजनेमुळे वस्तीचे स्वरूप बदलून ते अधिक सुंदर आणि स्वच्छ होईल. कातपूर येथे दलीतवस्ती सुधार योजना अंतर्गत दलीत वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सहदेव मस्के, सरपंच रेणुकाताई आयतनबोयणे, उपसरपंच विष्णू (मनोज) बालासाहेब देशमुख, बाबासाहेब श्रीराम देशमुख, सुधीर देशमुख, महादेव मस्के, नवनिता मस्के, वैजीनाथआप्पा प्रभूआप्पा स्वामी, शिवाजीराव मस्के, पांडुरंग मस्के, श्रीरंग वाघमारे, सुरेश सावळे, आनंद सावळे, अदित्य देशमुख, नानासाहेब काळे, अविष्कार देशमुख, अनिरुद्ध मस्के, भाऊसाहेब मस्के, सुभाष सोनकांबळे, तुकाराम देवकते, परमेश्वर मस्के, विश्वकर्मा पांचाळ, अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.