17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयकावड यात्रेला अडचण नाही, तर २० मिनिटांच्या नमाजला का?

कावड यात्रेला अडचण नाही, तर २० मिनिटांच्या नमाजला का?

खासदार चंद्रशेखर आझाद यांचे मोठे वक्तव्य

लखनौ : उत्तर प्रदेशमधील नगिना लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार चंद्रशेखर आझाद हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. या व्हीडीओमध्ये चंद्रशेखर आझाद असे म्हणताना दिसत आहेत की, जेव्हा कावड यात्रेसाठी सर्व रस्ते आणि रुग्णालये बंद केली जाऊ शकतात, तर ईदच्या दिवशी २० मिनिटे नमाज अदा करण्यात कोणाला काही अडचण का आहे? आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे नगिनाचे खासदार चंदद्रशेखर यांनी म्हटले.

जे लोक २० मिनिटे नमाज अदा करण्यास आक्षेप घेऊ शकतात ते कोणत्याही धर्माचे असू शकत नाहीत, असेही आझाद म्हणाले. सूत्रांकडून हा व्हीडीओ २३ जूनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. नगिना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी नजीबाबादच्या चंदनपूर गावात एका सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते की, हिंदूंच्या कावड यात्रेसाठी २० दिवस राज्यातील सर्व रस्ते, रुग्णालयेही बंद केले असता त्यामुळे कुणालाही काही अडचण होत नाही. तर २० मिनिटांच्या नमाजावर कोणाला आक्षेप का आहे, असा सवाल त्यांनी योगी सरकारला केला आहे. खासदार आझाद यांचा हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत असून, लोक यावर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR