22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरकिरकोळ बाजारात भाजीपाला तेजीत

किरकोळ बाजारात भाजीपाला तेजीत

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक चागलीच मंदावली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव तेजीत आहेत. त्यातच भाजीपाल्याची आवकही मंदावली असल्याने भाजीपाला बाजारात आलेल्या नागरिकांचाही चांगलाच हिरमोड झालेला दिसून येत आहे. एप्रिल महिन्यांपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झालेला होता. परंतु आता गेल्या काही दिवसापासून बाजार समितीतली आवकसुध्दा मंदावली असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाला चांगलाच तेजीत आलेला आहे.
आवक मंदावली असल्याने भाजीपाला दरातही काहि प्रमाणात वाढ झालेली आहे. भेंडी, गवार, मिरची, टमॉटो आदी पालेभाज्या ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत. तर मेथी, शेपु, चुका, पालक आदी पालेभाज्याही ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. येथील महात्मा फुले मार्केट यार्डात आज पुन्हा भाजीपाल्याची आवक कमालीची घटली. शनिवारी सौघ्यासाठी अवघ्या ६०७ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस कमी होत चाल्याने किरकोळ बाजारात मात्र तेजी आली आहे. शहरातील  महात्मा फुले बाजार समितीत जिल्हयासह शेजारी जिल्हयातून तसेच आदी भागांतून भाजीपाल्याची आवक होते.  मागील काही काळात आवकाळी पाऊसाने भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर गेली पंधरा दिवसापासून कडाक्याचे ऊन आणि बदलते वातावर यात मात्र भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समीतीमध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने तूलनेत दिवसेंदिवस घसरत चालली आहे. त्यातच घाउक बाजारात सध्या भाज्यांच्या दरामध्ये दुप्पट तिप्पट वाढ करून किरकोळ विक्रीते आपला खिसा भरत असल्याचे दिसून येत आहेत.
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत येणा-या भाजीपाल्याची आवकही प्रती दहा किलोप्रमाणे  भाव मिळाला आहे. यात वागें १३ किंव्टल आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, भेंडी ४ क्विंटल आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ८७ क्विंटल आवक होवून १०० रुपयांचा दर मिळाला, फुल गोभी ८९ क्विंटल  आवक होवून ३४० रुपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ६६ क्विंटल  आवक होवून १३० रुपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे १३० क्विंटल  आवक होवून १२० रुपयांचा दर मिळाला, गवार १२ क्विंटल आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, गाजर १२ क्विंटल  आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, भोपळा ६ क्विंटल आवक होवून १६० रुपयांचादर मिळाला, कोथिंबीर ६१ क्विंटल  आवक होवून ३८० रुपयांचा दर मिळाला,  हिरवी मिरची ३७ क्विंटल आवक होवून ४२० रुपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची १७ क्विंटल  आवक होवून ३०० रुपयांचा दर मिळाला, शेवगा २२ क्विंटल  आवक होवून ३२० रुपयांचा दर मिळाला, मेथी १५ क्विंटल आवक होवून ७०० रुपयांचा दर मिळाला, कांदापात २ क्विंटल  आवक होवून १००० रुपयांचा दर मिळाला, कारले २ क्विंटल  आवक होवून ४२० रुपयांचा दर मिळाला, लिंबु १४ क्विंटल आवक होवून ४०० रुपयांचा दर मिळाला, काकडी ३१ क्विंटल आवक होवून ३०० रुपयांचादर मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR