27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकुत्रा, मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू

कुत्रा, मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू

कल्याणमधील धक्कादायक घटना

मुंबई : प्रतिनिधी
कल्याणमध्ये भटक्या कुत्रा आणि मांजरीने चावल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या वर्षभरात १८,७०० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावले आहे. मृत तरुणाने सुरुवातीला उपचार केले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पालिकेने याबाबत चौकशीचे आश्वासन दिले आहे.

कल्याणच्या गोल्डन पार्क इमारतीत राहणारा शुभम चौधरी नोकरीच्या शोधात होता. दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यावर त्याने उपचार घेतले नाहीत. मागील आठवड्यात मांजर चावल्यावरही त्याने दुर्लक्ष केले. या दरम्यान त्याची १० डिसेंबरला प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला कल्याणमधील खाजगी रुग्णालय, कळवा आणि शेवटी कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच १२ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR