22.2 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रकुर्बानीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

कुर्बानीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, दुकान सील

मुंबई : प्रतिनिधी
आज देशात बकरी ईदचा सण साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुंबईत या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील मांसाहार विक्री करणा-या दुकानाच्या मालकाने बोकडावर ‘राम’ लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत मटणाचे दुकान सील केले आहे.

मुंबईतील मांसाहार विक्री करणा-या दुकानाच्या मालकाने हिंदू देवतांचा अपमान केल्याची तक्रार सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात आली होती. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार हिंदू संघटना बजरंग दलाने केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दुकानमालकांसह एका कर्मचा-यासह ३ जणांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दुकानात २२ बकरे कुर्बानीसाठी आणले होते, मात्र त्यातील एका बक-यावर धार्मिक नाव लिहिले होते.’ तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवली असून मोहम्मद शफी शेख, साजिद शफी शेख आणि कुय्याम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी मनपा आणि इतर अधिका-यांकडेही हरकत घेतल्याचे अधिका-याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR