28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकुवेतमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग, ४१ जणांचा मृत्यू

कुवेतमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग, ४१ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये सर्वाधिक भारतीय; ५० पेक्षा जास्त जखमी
नवी दिल्ली : कुवेतच्या मंगाफ येथे आज सकाळी एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत ४३ जणांचा मृ्त्यू झाला असून ३० जण जखमी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये ४१ भारतीय नागरिक असल्याचे समजते. कुवेतमधील भारतीय दुतावासाने याबाबत माहिती देताना म्हटले की, या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. येथील मंगाफ शहरात सकाळी सहाच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कामगारांच्या निवासासाठी वापरण्यात येत होती, जेथे मोठ्या संख्येने कामगार राहत होते.

कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगाफ भागातील ६ मजले उंच इमारतीत ही आग लागली होती. या इमारतीमधील स्वयंपाकघरातून आगीने पेट घेतला, त्यानंतर ही आग सर्वत्र भडकली. या इमारतीमध्ये १६० जण राहत होते. हे सर्वजण एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या निवासाची सोय या इमारतीमध्ये करण्यात आली होती. दुर्दैवाने आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी आहेत.
भारतीय दूतावासानेही ट्वीट करून दिली माहिती कुवेतमधील भारतीय दूतावासानेही ट्वीटरवरून पोस्ट लिहिली आहे. भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दु:खद घटनेनंतर तात्काळ मदतसेवेसाठी हेल्पलाईन नंबर ९६५६५५०५२४६ जारी करण्यात आला आहे. सर्वच भारतीयांनी अपडेट माहितीसाठी या नंबरशी संपर्कात राहावे, सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहनही दूतावासाकडून करण्यात आले आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून शोक
कुवेत शहरात लागलेल्या या आगीच्या घटनेवर पराराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला. आगीच्या घटनेने दु:ख झाले आहे, या दुर्घटनेत ४१ पेक्षा जास्त नागरिकांचा मृ्त्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जखमी असल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय आपले राजदूत रुग्णालयात पोहोचले आहेत. पीडित कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत, तर जखमींना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही जयशंकर यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR