लातूर : प्रतिनिधी
कॅम्प लावून निवडश्रेणी प्रस्ताव निकाली काढण्या यावेत, १५ मध्ये असलेल्या पदवीधर मुख्याध्यापकांना वेतन वाढ देण्यात यावी तसेच कार्याेत्तर सांस्कृतिक स्पर्धेेत कवी संमेलन, गझल संमेलन सामाविष्ट करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना देऊन चर्चा केली. निवडश्रेणी अपात्र प्रस्ताव ३४३ शिक्षकांची यादी शिक्षणाधिका-यांंनी काढली आहे.
यात ९० टक्के शिक्षकांची त्रुटी शिक्षणाचे परवानगीपत्र जोडले नाही हा शेरा आहे जे की, कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव दीड वर्षापासून आजपर्यंत तीन वेळा सर्व पंचायत समितीला आपल्याकडून परत पाठविण्यात आले आहेत. याकडे जिल्हाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी लक्ष वेधले. या यादीत कांही सेवानिवृत्ती शिक्षक आहेत. त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले नाही, असा शेरा आहे जे की त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची संधीच मिळाली नाही, ते ही प्रस्ताव निकाली काढावेत. विद्यापिठाच्या यादीत नाव असतानाही त्यांची त्रुटी काढण्यात आली आहे. तेही निकाली काढावेत. कार्योत्तर मान्यता देवूनच निवड श्रेणीची यादी काढावी उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या ५ जाने. २०२४ च्या पत्रान्वये कॅम्प लावून याची पूर्तता करुन घ्यावी.
२ नोव्हेंरला प्रमोशन झालेले २१ तर पूर्वीचे ४३ पदवीधर मुख्याध्यापक आहेत. प्रमोशनने स. शि. जागा रिक्त झाल्या आहेत त्या जागी तात्पूर्ती व्यवस्था करावी. उपमुख्यकार्यकारी अधिका-यांचे दि १३ डिसेंबर २०२३ चे क्रिडा स्पर्धेतील पत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात काव्यलेखन, कविसंमेलन गझलसंमेलन हे विषय समाविष्ट करावेत. यावेळी राज्यसचिव आर. के. जाधव, मराठवाडा अध्यक्ष दिपक चामे, जिल्हाध्यक्ष दयानंद बिराजदार, सचिव काकासाहेब ठोके, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण गोजमगुंडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चेंटमपल्ले, जिल्हा सहसचिव दयानंद वायदंडे, औसा तालुकाध्यक्ष मोहन सावंत, उत्तम गवंडे, वाकडे व्ही. के, हेंगणे एस. एस, जाधव ए. पी. आदी उपस्थित होते.