निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील केळगाव व लांबोटा येथील वनविभागाच्या जंगलात वनविभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा कृत्रिम पानवट्याद्वारे वन्य प्राण्यांना जंगलात पाण्याची सोय करण्यात आली आहे.यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे . त्यामुळे वन्यप्राण्यांना जलसंजीवनी मिळाल्याचे पानवठ्यावर ट्रॅप कॅमेराद्वारे टिपलेल्या छायाचित्रातून निदर्शनास येते.
वनविभागाकडून जंगलात पाण्याची वनवा सुरू झाल्यानंतर एप्रिल , मे व जून या महिन्यामध्ये वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पानवळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जाते. जेणेकरून वन विभागातील वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निलंगा तालुक्यातील केळगाव व लांबोटा येथील वनविभागाच्या एकूण १०८.६८ हेक्टर जंगल क्षेत्रात वन विभागाकडून दहा पानवट्याची सोय करण्यात आली आहे. या पाणवट्यामध्ये वनपरक्षिेत्र अधिकारी शिल्पा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी संतोष बन व वनरक्षक सोपान बडगने यांनी टँकरद्वारे पाणी आणून जंगलातील पानवट्यात पाण्याची सोय केली आहे.