22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयकॉँग्रेसची विरोधी बाकांवर बसण्याची तयारी; मित्र पक्षांचा सरकारसाठी दबाव

कॉँग्रेसची विरोधी बाकांवर बसण्याची तयारी; मित्र पक्षांचा सरकारसाठी दबाव

नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रात सरकार स्थापनेची खात्री मिळत असेल, तरच कॉँग्रेस पुढचे पाऊल उचलणार आहे. काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यापासून काही अडचण नाही. परंतु, घटक पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर दबाव टाकत आहेत.

केंद्रात सत्ता स्थापनेसाठी २७२ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपप्रणीत एनडीकडे २९२ खासदार आहेत. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीकडे २३४ खासदार आहेत. म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून इंडिया आघाडी दूर आहे. मात्र, तरीही इंडिया आघाडीतील नेते सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत. केंद्रातल्या सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरणारे जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, काँग्रेसला सरकार स्थापनेची खात्री असेल, तरच पुढचे पाऊल उचलणार आहे. मात्र मोदी सरकारने जे निर्णय घेतले, ते बदलायचे आणि त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना चौकशीच्या फे-यात आणून घेरायचे ही इंडिया आघाडीतील कॉँग्रेसच्या मित्र पक्षांची रणनिती आहे. त्यामुळे पुरेसे बहुमत नसताना देखील केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसवर दबाव आणला जात आहे.

भाजपाने यावेळी ‘४०० पार’चा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात यावेळी भाजपाची घोडदौड २४० वर थांबली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमुळे भाजपाला पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागा ६२ वरुन ३३ वर आल्या. म्हणजे २९ जागांचा फटका बसला. महाराष्ट्रात ४१-४२ वर असणारी महायुती १७ पर्यंत घसरली. राजस्थानात २५ पैकी ११ जागांवर भाजपचे नुकसान झाले. त्यामुळे स्वबळावर बहुमताची मॅजिक फिगर गाठता आली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR