21.1 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रकोंढव्यामध्ये इमारतीत आग

कोंढव्यामध्ये इमारतीत आग

पुणे : प्रतिनिधी
इमारतीतील दुचाकीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील एनआयबीएम रोड, नताशा एन्क्लेव्ह या चार मजली इमारतीत घडली.

दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुस-या मजल्यावर असणा-या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत कोणी रहिवासी अडकले नसल्याची खात्री केली. आगीवर पाण्याचा मारा करत १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या सतर्कतेमुळे आग कुठल्याही घरात न पसरल्याने जीवितहानी झाली नाही. इमारतीत एका घरामधून लिकेज असणारा सिलिंडर जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. तळमजल्यावर असणारे सलूनचे दुकानही सुरक्षित राहिले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR