27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeराष्ट्रीयकोलकाता प्रकरणाचा जगभरातून निषेध

कोलकाता प्रकरणाचा जगभरातून निषेध

न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत लोक उतरले रस्त्यावर

कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेवर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. याबाबत ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत.

विशेषत: डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक कोलकाता प्रकरणात न्याय देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. आता हा विरोध जागतिक पातळीवर पोहोचला आहे. जगभरात पसरलेले भारतीय वंशाचे लोक या मुद्यावर आवाज उठवत आहेत आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ १४ ऑगस्टच्या रात्री न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर जोरदार निदर्शने करण्यात आली आणि निदर्शकांनी बंगालमध्ये आंदोलन करणा-या विद्यार्थी आणि डॉक्टरांना पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील लेक हॉलीवूड पार्क येथे यासोबतच ुस्टन, शिकागो, लंडन आणि अटलांटा येथील भारतीय वंशाचे लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध करत न्यायाची मागणी केली. यावेळी आंदोलकांच्या हातात फलक आणि बॅनर होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR