24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरातील विजयानंतर छत्रपती शाहू महाराज मातोश्रीवर

कोल्हापुरातील विजयानंतर छत्रपती शाहू महाराज मातोश्रीवर

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेला मिळालेल्या झंझावाती यशानंतर श्रीमंत शाहू छत्रपती आज (१० जून) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून शाहू महाराज यांचे जोरदार स्वागत व आदरातिथ्य करण्यात आले. शाहू महाराजांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर लोकसभा हा पारंपारिक ठाकरे गटाचा मतदारसंघ आहे.

मात्र, शाहू महाराजांनी निवडणुकीच्या ंिरगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडली होती. काँग्रेसकडून शाहू महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख ५४ हजारांवर मतांनी पराभव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR