35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्र कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, ३ ठार

 कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, ३ ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी
बेळगावहून कोल्हापूरला निघालेल्या कंटेनरने तब्बल ७ वाहनांना धडक दिली. कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर, ६ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यात वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्यावेळी एक कंटेनर बेळगावरून कोल्हापूरला जात होता. यावेळी कंटेनरचा वेग जास्त होता. अशातच निपाणी जवळील तवंदी घाटात हा कंटेनर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी या कंटेनरने २ लॉरी, ३ कार, १ कंटेनरसह काही दुचाकी गाड्यांना धडक दिली. यात कारमधील दोघांचा आणि एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, निपाणी मधील रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमी नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात आले. हा अपघात नेमका कसा झाला. याचा तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR