22.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeपरभणीकौसडी मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कौसडी मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कौसडी : येथील विकास कामाच्या उद्घाटनात अडथळा निर्माण करून उपसरपंचाच्या पतीसह अन्य एकास अपात्र सरपंचासह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या रविकांत देशमुख, मुजाहेद कादरी यांनी उपचार पूर्ण होताच पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अपात्र सरपंच मोबीन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य शेख अवेस, अलाउद्दीन कुरेशी, मतीन कुरेशी अशा ४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येत होते. वार्ड क्रमांक ५ मधील हजरत ख्वाजा कमालोद्दीन दर्गा कब्रस्तान मधील शादी खाण्यासमोरील मोकळ्या जागेत गट्टू बसवण्याचे काम सुरु करण्यात आले असता त्या ठिकाणी अपात्र सरपंच मोबीन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य शेख अवेस व अन्य दोघांनी येऊन कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ करत उपसरपंच पती रविकांत देशमुख व मुजाहेद कादरी यांना खाली पाडून काठ्यानी व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत उपसरपंच पती रविकांत देशमुख यांना छातीत मार लागला तर मुजाहेद कादरी यांच्या हात, खांद्याला मार लागला. उपस्थित नागरिकांनी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांना दाखल केले असता डॉक्टरांनी प्रथमोपचार करून परभणी येथे उपचारासाठी पाठवले होते. तीन दिवस उपचार घेऊन आल्यानंतर पोलीस ठाणे गाठून उपसरपंच पती रविकांत देशमुख यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR