22.4 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeसोलापूरक्षयरोग शोध मोहिमेत आढळले नवे ३९ क्षयरुग्ण

क्षयरोग शोध मोहिमेत आढळले नवे ३९ क्षयरुग्ण

सोलापूर:राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर म हापालिकेच्या शहर क्षयरोग केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेत नवे ३९ क्षयरुग्ण आढळले. या मोहिमेत १ लाख २५ हजार ७१६ इतक्या लोकसंख्येचे सव्हें क्षण करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत शहर क्षयरोग केंद्र, सोलापूर महापालिकेच्या वतीने सोलापूर मनपा कार्यक्षेत्रात सक्रिय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत आशा सेविका व एमपीडब्ल्यू कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन अतिजोखमीच्या भागात सर्व्हेक्षण केले.

या मोहिमेत १ लाख २५ हजार ७१६ इतक्या लोकसंख्येचे सर्व्हे क्षण करण्यात आले. त्यापैकी १२०० संशयीत क्षयरुग्णांची भुंकी तपासणी केली. क्ष-किरण तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ३९ नविन क्षयरुग्ण शोधण्यात आले.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आयुक्त शीतल तेली-उगले, उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांचे मार्गदर्शन लाभले. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी या मोहिमेचे सनियंत्रण करुन मोहिम यशस्वी केली. दोन आठवडयाचा खोकला, वजन कमी होणे, धुंकीतून रक्त पडणे, सायंकाळी बारीक ताप येणे, अंगावर गाठ असणे आदी प्रकारची लक्षणे असल्यास शहर क्षयरोग केंद्र, डफरीन हॉस्पीटल येथे नागरिकांनी संपर्क साधावा व मोफत तपासणी व मोफत उपचाराचा लाभ घ्यावा. सोलापूर शहर क्षयमुक्त करण्यासाठी संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR